TOC

This article is currently in the process of being translated into Marathi (~99% done).

Introduction to HTML:

What is HTML?

काय आहे एचटीएमएल?

एचटीएमएल एक अशी प्रोग्रामिंग भाषा आहे जी एका वेबपेजच्या रचनेचे सर्वात सोप्या रीतीने वर्णन करण्यासाठी वापरली जाते. एचटीएमएल हे हाइपरटेक्स्ट मार्कअप लैंग्वेज चे संक्षिप्त रूप आहे. जेव्हा एक वेब ब्राउजर उदाहरणार्थ इंटरनेट एक्स्प्लोरर, फ्यरफ़ॉक्स किंवा क्रोम एक वेबपेज दाखवतो, तेव्हा तो खरे पाहता एक एचटीएमएल दस्तऐवज वाचून त्याला दाखवत असतो. हा दस्तऐवज 10 ओळींपासून काही हजार ओळींपर्यंत असू शकतो, ज्याचा ब्राउजरला जास्त फरक पडत नाही - तो फक्त तुमचा दस्तऐवज वाचतो.

आणि हा आहे एचटीएमएलचा मुख्य उद्देश्य - एचटीएमएल दस्ताऐवजामध्ये लिहिल्या गेलेल्या आशयास वेब ब्रावजर्स पर्यंत पाहोचविणे. एचटीएमएल दस्ताऐवजामध्ये लिहिलेल्या आशयास वेब ब्रावजर्सपर्यंत पाहोचविण्याशिवाय, एचटीएमएल तुम्ही लिहिलेल्या आशयामध्ये सेमांटिक्स (तार्किक आणि अर्थपूर्ण माहिती) टाकतो - ज्यामुळे वेब ब्रावजर्स आणि सर्च इंजिनला समजेल कि आपण कोणत्या प्रकारचा आशय वेब पेज पर टाकला आहे आणि कश्याप्रकारे तो आशय हाताळल्या गेला पाहिजे.

एचटीएमएलचा मूळ उद्देश्य तुमच्या वेब पेजेसना अर्थपूर्ण बनवणे हा आहे (काही असे मानतात कि एचटीएमएल तुमच्या वेब पेजेसना दार्शनिकरित्या प्रभावित करते, पण ही जास्ततर मानायची गोष्ट आहे आणि आपण याबद्दल नंतर पाहूया) ज्यामुळे ब्राउजर त्याला दाखवू शकेल.

आणि काय आहे एचटीएमएल५?

मग साधारण एचटीएमएल आणि एचटीएमएल५ मध्ये काय फरक आहे? आपण या पूर्ण शिकवणीमध्ये या प्रश्नाचे उत्तर पाहूया, परंतु एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे कि, आतापर्यंत एचटीएमएलबद्दल तुम्ही जे काही शिकलात ते एचटीएमएल५साठी अजूनही लागू होते - तुम्हाला काहीही विसरण्याची गरज नाही.

एचटीएमएल५मध्ये अजून बरीचशी नवीन वैशिष्ट्ये (संकल्पना) आहेत आणि प्रत्येक वैशिष्ट्याविषयी आपण या शिकवणीमध्ये नंतर पाहू. पण खरे पाहता, एचटीएमएल५ ही एचटीएमएलची केवळ पाचवी आवृत्ति नाही - एचटीएमएल५ मुळात त्या लोकांकडून निर्माण केले गेले ज्यांच्यावर अधिकृत एचटीएमएल मानकांचे दायित्व नाही. एचटीएमएल५ची व्याप्ति समजणे इतके सोपे नाही - खरी समस्या तर ही आहे की, बरेच लोक जेव्हा एचटीएमएल५ या संज्ञेचा का उपयोग करत असतात तेव्हा ते खरे तर "एचटीएमएल५ आणि संबंधित मानक जसे की सीएसएस३" चा उल्लेख करत असतात.

या शिकवणी मध्ये एचटीएमएल५ ची मूळ वैशिष्टये, कोण त्यांचा वापर करतो आणि ते कशाप्रकारे "जुन्या" एचटीएमएल४ पेक्षा वेगळे आहेत यावर लक्ष केंद्रित केलेले आहे।

एचटीएमएल५ चा वापर करताना तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे कि त्याची सर्वच वैशिष्ट्ये सर्वच ब्राउजर्सवर चालत नाहीत - वेगवेगळ्या ब्राउजर्सचे वेगवेगळे सिद्धांत असतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यात जाणीवपूर्वक काही बदल करावे लागतील ज्यामुळे एचटीएमएल५ची काही वैशिष्ट्ये सर्व ब्राउजर्सवर व्यवस्थितपणे चालू शकतील.

परंतु एक गोष्ट नक्की आहे - एचटीएमएल५ भविष्य आहे की, कश्याप्रकारे वेब पेजेस बनवले जातील. अँपल आणि गूगल अगोदरच खुप प्रमाणात एचटीएमएल५च्या वैशिष्ट्यांचे समर्थन करतात. द वर्ल्ड वाईड वेब कॉनसॉर्टीयमने एचटीएमएल५च्या समर्थनार्थ त्यांचे स्वतःचे xHTML च्या Next Generation चे काम सोडून दिले आहे. चला तर मग सुरु करूया!


This article has been fully translated into the following languages: Is your preferred language not on the list? Click here to help us translate this article into your language!
adplus-dvertising