This article is currently in the process of being translated into Marathi (~99% done).
The Structure of HTML
एचटीएमएलचा वापर सुरु करण्यापूर्वी आपण एचटीएमएलची संरचना समजून घेणे महत्वाचे आहे. एचटीएमएल ही एक मार्कअप भाषा असल्यामुळे, तुम्ही तीचा वापर तुमच्या आशयातील वेगवेगळ्या भागांना मार्क(चिन्हित) करण्यासाठी करता - ज्याप्रमाणे तुम्ही हायलायटर चा वापर शब्दांना अधोरेखित करण्यासाठी करता.
एचटीएमएल एलेमेंट्स
एचटीएमएल तिच्या एलिमेंट्सने (मूळ आणि प्राथमिक अंगांनी) बनलेली आहे, आणि हे तेच एलिमेंट्स आहेत ज्यांचा तुम्ही मार्कअपसाठी वापर करता. खाली एक उदाहरण दिलेले आहे ज्यामध्ये तुम्ही एक साधारण परिच्छेद(पॅराग्राफ)कसा मार्कअप करू शकता हे दाखविण्यात आले आहे.

This paragraph is part of my content

इथे आपल्याकडे एक वाक्य आहे ("This paragraph is part of my content"), जे
and
मध्ये लिहिले आहे.
and
ला टॅग्स(tags) असे म्हणतात. प्रत्येक टॅग हा <, एक संक्षिप्त रूप आणि > यांनी बनलेला असतो. या उदाहरणामध्ये, 'p' हे paragraph चे संक्षिप्त रूप आहे.
आणि
चा मिळून एक एलिमेंट बनतो. प्रत्येक एचटीएमएल एलिमेंटची सुरुवात ओपनिंग टॅग (सुरुवातीचा टॅग)ने होते (या उदाहरणात
) आणि बहुतेक एलिमेंट्सना क्लोजिंग टॅग (इथे
) असतो. तुमच्या ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग मध्ये वास्तविक आशय असतो.
रिक्त एलेमेंट्स
बहुतेक एचटीएमएल एलिमेंट्स

एलिमेंटसारखे दिसतात परंतु असे काही एलेमेंट्स आहेत ज्यांना आपण रिक्त एलेमेंट्स म्हणतो. लाइन ब्रेक (नवीन ओळीसाठी वापरला जाणारा) एलिमेंट याच प्रकारचा एलिमेंट आहे जो असा दिसतो:

आपण पाहू शकता की, इथे क्लोजिंग टॅग नाहीय आणि एलिमेंट मध्ये काहीही आशय लिहिलेला नाहीय,त्यामुळे त्याला एम्पटी (रिक्त) एलिमेंट म्हणतात. हा एम्पटी एलिमेंट असल्यामुळे, त्याला एलेमेंटच्या शेवटी बंद करण्यात येते - ते आहे /. एलिमेंटचा शेवट करताना तुम्हाला "/" चा वापर करायची खरे तर गरज नाही, पण तसे लिहिणे एक चांगली पद्धत आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची सवयसुद्धा होऊ शकते(अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणताही टॅग हा एका संक्षिप्त रूपाने बनवलेला असतो, या उदाहरणात तो br आहे जे break संक्षिप्त रूप आहे).
टीप!
जेव्हा ब्राउजर्स एचटीएमएल५ दस्तऐवज वाचत असतात तेव्हा त्यांना तुम्ही टॅग्स कॅपिटल किंवा स्मॉल लिपीमध्ये लिहिला आहे याचा फरक पडत नाही. परंतु इतर डेव्हलपर्सना त्याचा फरक पडतो. जरी आपण तोच लाईन ब्रेक टॅग खाली दाखविल्याप्रमाणे अनेक प्रकारे लिहू शकत असाल:

आपल्या सर्व टॅग्सना स्मॉल (लोवर) लिपीमध्ये लिहिणे ही एक चांगली सवय मानली जाते - त्यामुळे वाचनीयता वाढते, आणि टॅग्स अश्याप्रकारे लिहिणे एक चांगली कला मानली जाते.
आपण काय शिकलात
- एका एचटीएमएल एलिमेंटची सुरुवात एका ओपनिंग (सुरुवतीच्या) टॅगने होते.
- एका एचटीएमएल एलिमेंटचा शेवट एका क्लोजिंग (बंद करणाऱ्या) टॅगने होतो.
- एक एचटीएमएल टॅग < ने सुरु आणि > ने बंद होतो.
- < आणि > च्यामध्ये लिहिलेले अक्षर संक्षिप्त रूप असतात.
- एलेमेंटच्या स्टार्ट टॅग आणि एन्ड टॅगमध्ये लिहिलेले सर्व काही त्या एलेमेंटचा आशय असतो.
- काही एचटीएमएल एलेमेंट्स एम्पटी(रिक्त) असतात.
- एम्प्टी(रिक्त) एलिमेंट्स स्टार्ट (सुरुवातीच्या) टॅगमध्ये बंद केले जातात.
- तुमचे सारे टॅग्स लोअर(स्मॉल) लिपिमध्ये लिहिण्याची सवय करा - असे लिहिणे ही एक आदर्श पद्धत मानली जाते.